देशाला अधिक बलशाली आणि मजबूत लोकशाही राष्ट्र बनविण्यासाठी संकल्प करूया- महापौर माई ढोरे
![Let's resolve to make the country a stronger and stronger democratic nation- Mayor Mai Dhore](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/P3.jpg)
पिंपरी |
भारतीय संविधानाच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाच्या तत्वावर आधारीत समाज आणि राष्ट्र निर्मितीसाठी आपण सर्व कटीबध्द होवून या देशाला अधिक बलशाली आणि मजबूत लोकशाही राष्ट्र बनविण्यासाठी संकल्प करुया असे आवाहन महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी केले. तुमचे सहकार्य आणि योगदान या शहराच्या इतिहासातील सुवर्ण पान ठरेल असा आशावाद देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त शहरवासियांना त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७१ वा वर्धापन दिन महापालिकेच्यावतीने उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे. त्यानंतर शहरवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना त्या बोलत होत्या.
काल सकाळी झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर केशव घोळवे, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, आयुक्त श्रावण हर्डीकर, शिक्षण समिती सभापती मनिषा पवार, अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास उर्फ बाबा बारणे, अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसदस्य भाऊसाहेब भोईर, विलास मडिगेरी, शैलेंद्र मोरे, माजी महापौर अपर्णा डोके, नगरसदस्या सारिका सस्ते, मिनल यादव, सुजाता पालांडे, अनुराधा गोरखे, शारदा सोनवणे, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, उपायुक्त सुभाष इंगळे, अजय चारठणकर, आशादेवी दुरगुडे, चंद्रकांत इंदलकर, मंगेश चितळे, नगरसचिव उल्हास जगताप, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी, भारतीय संविधानाच्या उददेशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हे वाचन केलेले आहे. देशाचा विकास हा शहर विकासावर अवलंबून असतो असे नमुद करुन महापौर ढोरे म्हणाल्या, पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी आपले समर्पण देणा-या प्रत्येकाचा त्याग महत्वपूर्ण आहे. कामगारांनी आणि कष्टक-यांनी या भूमीला आपल्या घामाने फुलवले. इथल्या उदयोगधंदयांनी या नगरीला वैभवशाली बनविले. शहरातील कष्टकरी, कामगार, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शिक्षक, व्यापारी, उदयोजक, पोलीस, सैनिक, डॉक्टर, अभियंते, संशोधक, खेळाडू, कलावंत, साहित्यिक अशा सर्वांच्या त्यागातून, परिश्रमातून, योगदानातून आजची पिंपरी चिंचवड औदयोगिक नगरी घडली आहे. या शहराला स्मार्ट सिटी बनवणा-या सर्वांप्रती महापौरांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
वाचा- शेतकरी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 300 पोलिस कर्मचारी जखमी