दुधिवरे खिंडीजवळ शीर नसलेला आढळला मृतदेह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/images-10.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – लोणावळा येथील दुधीवरे खिंडीजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांमध्ये एक शीर नसलेला मृतदेह सापडला. रविवारी ही घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय ३० ते ३५ वर्षे आहे.
लोणावळा पवनानगर परिसरात पुरुषाचे शीर कापून धडावेगळे करून एका पोत्यात बांधून टाकलेले आढळून आले. या मृत व्यक्तीच्या अंगात निळा, आकाशी पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या असलेला टी-शर्ट आणि काळ्या रंगाची ट्रॅकपँट असल्याचे पोलिसांनी सांगितले. या व्यक्तीच्या उजव्या पंजावर धारदार शस्त्राने वार केलेले आहेत. या वर्णनाची व्यक्ती हरविली असल्याची तक्रार लोणावळा, तसेच आसपासच्या पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे का, याची माहिती पोलिस घेत आहेत. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून या व्यक्तीबद्दल कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी लोणावळा पोलिसांशी ०२१४-२७३०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.