breaking-newsपिंपरी / चिंचवड

थेरगाव येथे पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार; तरुणाचा खून

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

पूर्ववैमनस्यातून तीन जणांनी कोयत्याने वार करून तरुणाचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि.5) रात्री पावणेआठच्या सुमारास थेरगाव-जगताप नगर येथे घडली.

ऋषभ बालाजी गायकवाड (वय 20 वर्ष, रा. जगताप नगर, थेरगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.  ऋषभ आणि त्याचे मित्र रात्री बसले होते. त्यावेळी जुन्या भांडणातून त्यांच्यात बाचाबाची झाली. तिघांनी ऋषभ याच्यावर कोयत्याने वार केले.

जखमी झालेल्या ऋषभला उपचारासाठी पिंपरीतील संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वाकड पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button