breaking-newsपिंपरी / चिंचवड

थर्मल मशिनगन आणि सॅनिटायझर हलक्या दर्जाचे असल्यामुळे मनपा कर्मचारी कोरोनाबाधीत

  • विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा प्रशासनावर आरोप

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी–चिंचवड महापालिका भवनाच्या प्रवेशद्वारावर प्रत्येकाची टेम्परेचर थर्मल मशिनगनने तपासणी केली जाते. ते यंत्र कुचकामी आहे. तेथील सॅनिटायझरही हलक्या दर्जाचे असते. अनेकदा सॅनिटायझर उपलब्ध नसते. त्यामुळे पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी गुरुवारी (दि. ९) केला.

तपासणीसाठी दर्जेदार साहित्य वापरण्याचा सल्ला त्यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे. पालिकेतील ४० पेक्षा अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात सहायक आयुक्तांसह कर संकलन, वैद्यकीय, भांडार, आरोग्य, स्थापत्य आदी विभागाचे कर्मचारी आहेत. पालिका भवन व सर्व क्षेत्रीय कार्यालयात अद्यापि सॅनिटायझरची व्यवस्था केली गेलेली नाही. काही कर्मचारी तोंडावर पूर्णपणे मास्क लावत नाहीत, अशी तक्रार काटे यांनी केली आहे.

पालिका भवन व सर्व क्षेत्रीय कार्यालय तसेच, पालिकेच्या सर्व कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अत्याधुनिक व दर्जेदार थर्मल स्कॅनर मशिन, ऑक्सीमीटर वापरण्यात यावे. त्यामुळे संभाव्य कोरोनाबाधितांची अथवा अन्य आजार असलेल्यांची ओळख पटू शकेल. तसेच पालिकेत कोरोनाचा प्रसार होणार नाही, अशी मागणी नाना काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button