त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जिजामाताच्या माजी विद्यार्थ्यांनी साधले हितगुज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/IMG-20181123-WA0042.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त भोसरीतील सेवागिरी शिक्षण संस्था संचलित जिजामाता विद्यालयात गुरूवारी (दि. 22) दीपोत्सव साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रात यशाचे शिखर गाठलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावून एकमेकांशी हितगुज साधले.
पिंपरी-चिंचवडमधील नवोदीत उद्योजिका कविता भोंगाळे कडू पाटील यांचा सक्रीय सहभाग होता. शाळेत शिक्षण घेऊन ज्यांनी ज्यांनी विविध क्षेत्रात यशाचे शिखर गाठले आहे. त्याचे सर्वस्वी श्रेय हे शाळेतील तत्कालीन शिक्षकांना, मुख्याध्यापकांना जाते. या स्पर्धात्मक युगात या माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी सहकार्याची भावना ठेवून विकासात योगदान द्यावे, अशी भावना उद्योजिका कविता भोंगाळे कडू पाटील यांनी व्यक्त केले.
शाळेत शिकून मोठे झालेल्या माजी विद्यार्थ्यांना आजही शाळेविषयी तेवढेच प्रेम वाटते. त्यांना शाळेची आठवण येते. आजही त्यांना शाळेत यावेसे वाटते. त्यांच्या भावनेतच आम्हाला आमच्या अध्यापनाची पोचपावती मिळाल्याचे समाधान संस्थेचे सचिव अमित कुलकर्णी यांनी व्यक्त केले. दिपोत्सवास विद्यालयाच्या अध्यक्षा आशा कुलकर्णी, सचिव अमित कुलकर्णी, मुख्याध्यापक निलेश गायकवाड आदींचा सहभाग होता.