Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

…त्या शिक्षकाच्या विरोधात भाजप शहर महिला मोर्चाचे आंदोलन

  • शिक्षकाला निलंबित करण्याची मागणी
  • प्रेरणा विद्यालयाच्या प्रचार्या इथापे यांना पत्र

पिंपरी – भाजप खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्या विषयी फेसबुकवर आक्षेपार्ह कॉमेंट केल्याने शिक्षक संजय कु-हाडे यांच्या विरोधात भाजपच्या पिंपरी-चिंचवड महिला मोर्चाने आंदोलन केले. शिक्षक कु-हाडे याला तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी अध्यक्षा शैला मोळक यांनी केली.

 

याबाबत कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रेरणा विद्यालयाच्या प्राचार्या शुभांगी इथापे यांना शैला मोळक यांनी पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या निगडी येथील प्रेरणा विद्यालयातील सहशिक्षक संजय कु-हाडे याने मंत्री पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टवर खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्याबाबत अश्लील कमेंट केली. महिलांच्या सुरक्षेबाबत समाजात चर्चा सुरू असताना अशा प्रकारच्या कॉमेंट करणे चुकीचे आहे. प्रेरणा विद्यालयातील सहशिक्षकाने केलेल्या या कृत्याबद्दल त्याला तात्काळ संस्थेतून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे.

 

यावेळी उमा खापरे, संगीता सुतार, अरुणा घोळवे, सारिका चव्हाण, रेखा कडाली, सविता कर्वे, राधिका बोर्लीकर, शोभा भराटे, माधवी इनामदार, राजश्री जायभाय, पल्लवी वाल्हेकर, अश्विनी औसेकर, अश्विनी दाभाडे आदी उपस्थित होते.

 

घटना कृम

घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी दहीहंडी उत्सवात महिलांबाबत वादग्रस्त विधान केले. त्यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी मध्यंतरी एक ‘राम कदम केवळ बोलले, ते तसे काही करत नाहीत, करणार नाहीत’ अशा आशयाची पोस्ट फेसबुकवर कदम यांना सावरून घेण्याचा पयत्न केला. या पोस्टवर पिंपरी-चिंचवडमध्ये शिक्षक असलेल्या संजय यांनी कमेंट केली. त्यामध्ये ‘तुमची बहीण खासदार प्रितम मुंढे अविवाहित आहे, तिला पळवून नेले तर चालेल का? अशा आशयाची पोस्ट केली. त्यावर संजय आणि त्यांच्या पत्नीचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करून त्यावर अश्लील कमेंट्स केल्या.

यानंतर शनिवारी (दि. 8) सकाळी साडेअकराच्या सुमारास संजय यांना मुंढे समर्थकांनी निगडी येथील निवेदिता बँकेसमोर बोलावून घेतले. फेसबुक लाईव्ह सुरू केलं. आधी पोस्ट केलेल्या वक्तव्याची माफी मागायला लावली आणि मग शिवीगाळ करत मारहाण केली. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button