त्या चिमुरडीचा गळा घोटणारा निघाला चुलता, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/arrest.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपळे सौदागर येथील अडीच वर्षाच्या चिमुरडीवर तिच्या चुलत्यानेच अत्याचार करून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार चौकशीतून समोर आला आहे. या प्रकरणी चुलत्याला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पिंपळे सौदागर येथील लेबर कँप येथील वस्तीतून अडीच वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला होता. ही मुलगी सोमवारी मध्यरात्रीपासून बेपत्ता होती. पहाटे तीन वाजेपर्यंत या मुलीचा तिच्या आई वडिलांनी शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही, त्यानंतर सांगवी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी दिली.
पोलिसांनी या मुलीचा शोध सुरू केला असता मिलिट्री कॅम्पच्या कंपाऊंडच्या आत पाण्याच्या खड्ड्यात या मुलीचा मृतदेह पहाटेच्या सुमारास सापडला. शवविच्छेदनात या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.