तरुणाला रस्त्यात अडवून मारहाण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/CRIME-1-2.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
तलफ भागवण्यासाठी वाटसरूने चिलीम, बीडी, तंबाखू न दिल्याने एकाला रस्त्यात बेदम मारहाण करून लुटले. रविवारी (दि. 19 मध्यरात्री एकच्या सुमारास देहूफाटा येथील बस स्थानकासमोर ही घटना घडली.
महेश सुधाकर माळी (वय 42, रा. इंद्रायणी घाट, आळंदी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माळी आणि त्यांचे मित्र निगडीहून आळंदीच्या दिशेने सोमवारी (दि. 20) पहाटे एकच्या सुमारास जात होते. दरम्यान, देहूफाटा येथे आरोपींनी त्यांना अडवले. तुमच्याकडे चिलीम, तंबाखू आहे का, असे विचारून आरोपींनी त्यांचे खिसे तपासले. यावेळी माळी यांचा मित्र तेथून पळून गेला. माळी यांनी आरोपींना प्रतिकार केला असता आरोपींनी त्यांच्या खिशातील सातशे रुपये काढून घेत लाकडी दांडक्याने मारहाण केली. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.