‘गे’ च्या भुमिकेसाठी आयुषमानने घातली ‘नोजपिन’…चाहते झालेत या लुकवर फिदा…

एकावर एक हीट चित्रपट देणारा तेही वेगळी भुमिका आणि वेगळा आशय घेऊन सतत काही वेगळे देण्याचा अंदाज प्रेक्षकांनाही भावलेला आयुषमान खुराणा पन्हा एकदा एका वेगळ्या विषयासह आणि एका वेगळ्या भुमिकेसह प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

‘शुभमंगल ज्यादा सावधान’ त्याच्या या आगामी चित्रपटात तो गे पात्र साकारताना दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलरही नुकताच रिलीज झाला आहे. मात्र या चित्रपटाच्या ट्रेलरसोबतच या चित्रपटात आयुषमानने घातलेली ‘नोजपिन’ही सध्या चर्चेचा विषय ठरतेय.‘शुभमंगल ज्यादा सावधान’ या सिनेमात समलिंगी पुरुषाची भूमिका करताना त्याने चक्क नोजपिन घातली आहे.समलिंगी पुरुषांच्या हक्कांबाबत भाष्य करणारा हा सिनेमा आहे.
या ट्रेलरमधील आयुषमान आणि जितेंद्र कुमारचा लिप लॉक सीन, ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’ मधील सिमरन-राजचा तो आयकॉनिक सीन या सगळ्यांसोबत आयुषमानच्या नाकातील नोजपिन सगळ्यांचे लक्ष वेधून घेतेय.नोजपिन घातलेली असली, तरी कुठलेही साचेबद्ध हावभाव यात त्याने केलेले दिसत नाहीत. म्हणूनच त्याच्या या नोजपिन लुकवर चाहते फिदा आहेत. याचित्रपटातील आयुषमानच्या शर्टलेस लुकवरही चाहते फिदा झाले आहेत.


येत्या 21 फेब्रुवारी 2020 चित्रपट दर्शित होणार असून यामध्ये नीना गुप्ता आणि गजराज राव पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. तर, त्यांच्यासोबत सुनिता राजवार, मानवी गगारू, पंखुडी अवस्थी, नीरज सिंग, मनु ऋषी चड्ढा हेही या चित्रपटात दिसणार आहेत.





