तरुणाचा महागडा मोबाईल हिसकावून नेल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल
![Farmers will now be able to register their crops through the mobile app](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/mobile-phone-.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मोटारीची वाट पाहत थांबलेल्या तरुणाला धमकावून त्याच्याजवळील 86 हजार रुपयांचा अॅप्पल मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 13) रात्री नऊच्या सुमारास भोसरी एमआयडीसीमध्ये घडला.
याप्रकरणी हेमंत शरदचंद्र श्रीनिवास वेलुरी (वय 30, रा. जय कृष्ण पुरम, राजमंडरी, नेलुरी स्ट्रीट, जि. गोदावी पुर्व, आंध्रप्रदेश) यांनी तक्रार केली आहे. याप्रकरणी दुचाकीवरील दोन तरुणांच्या विरुध्द गुन्ह्याची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नऊच्या सुमारास जे ब्लॉक मिस्तुसुभिशी इलेक्ट्रीक कंपनी समोरील रस्त्यावर मोबाईलद्वारे बुक केलेल्या मोटारीची हेमंत वाट पाहत होता. त्यावेळी दोन अनोळखी तरुण दुचाकीवरून त्याठिकाणी आले. त्याला धमकावून जवळील 86 हजार रुपयांचा अॅप्पल कंपनीचा मोबाईल दोघांनी जबरदस्तीने काढून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.