तडीपार गुंड इंद्र्याला देहूगावातून अटक; खंडणी, दरोडा विरोधी पथकाची कामगिरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/arrest-LOCKER-1.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – तडीपार असुनही देहूरोड परिसरात खुलेआम फिरणा-या इंद्र्या या गुन्हेगाराला पोलिसांनी देहूगावातून अटक केली. खंडणी, दरोडा विरोधी पथकाने शनिवारी (दि. 16) ही कारवाई केली.
इंद्रया उर्फ इंद्रजित बापू सपकाळे (वय 25, रा. मजीद समोर, काळाखडक झोपडपट्टी, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड-काळखडक येथे राहणारा गुंड इंद्रया याला तडीपार केले आहे. तरी, तो देहू परिसरात खुलेआम फिरत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी आशिष बोटके यांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी देहूगावातील कमानीजवळ सापळा रचला. पुणे जिल्ह्यात येण्याबाबतची त्याच्याकडे विचारणा केली. त्यावर त्याने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. त्यावर पोलिसांनी त्याला अटक केली. इंद्र्याला 6 फेब्रुवारीपासू पुणे जिल्ह्यातून दीड वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याच्यावर चोरी, लूटमार, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत.
खंडणी, दरोडा विरोधी पथकाचे सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक पुरूषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी अजय भोसले, राजेंद्र शिंदे, शैलेश सुर्वे, उमेश पुलगम, आशिष बोटके, विक्रांत गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.