ड्रेनेज खोदलेल्या खड्यात पडून आठ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/Pimpari.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवडमध्ये ड्रेनेजच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्यात पडून 8 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शहरातील लष्करी हद्दीत राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या रहिवासी क्षेत्रात ही घटना घडली आहे.
श्रीरंग जोशी असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. गुरुवारी (5 जुलै) दुपारीही ही घटना घडली. सीएमई परिसरात ड्रेनेजसाठी खड्डे खोदले जात आहेत. त्यात पावसामुळे पाणी साचले आहे. तिकडे खेळण्यासाठी गेलेल्या श्रीरंगचा खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी नोंद केली आहे. खड्डे खोदल्यानंतर त्या भोवती सुरक्षेचा उपाय म्हणून जाळी का लावण्यात आली नव्हती. श्रीरंगला तिकडे जाण्यापासून का रोकल्या गेले नाही. याबाबत सीएमई प्रशासनाकडून अद्याप कोणताही खुलासा देण्यात आलेला नाही. दरम्यान, शुक्रवारी भोसरी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.