breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डॉ. हेमंत तापकीर यांनी खादी व ग्रामोद्योग मंडळाचा पदभार स्वीकारला

पिंपरी,  (महा-ई-न्यूज) – महाराष्ट्र खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या उपाध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा) डॉ. हेमंत बाबासाहेब तापकीर यांची नियुक्ती झाली आहे. तापकीर यांनी बुधवारी (दि. 6) या खात्याचा पदभार स्वीकारला आहे.

डॉ.  हेमंत तापकीर यांनी बुधवारी (दि. ६) मंडळाच्या मुख्य कार्यालयात मंडळाचे सभापती विशाल चोरडिया यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. एन. केरकेट्टा उपस्थित होते. डॉ. तापकीर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभच्छा दिल्या आहेत. तापकीर हे उच्चशिक्षित असून त्यांनी यापूर्वी केंद्रीय श्रमरोजगार मंत्रालयाच्या केंद्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी काम केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button