Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोदीसाहेब, जशोदाबेनचं काय झाल ते सांगा : धनंजय मुंडे

उस्मानाबाद –  माझा सारखा एखादा तुमच्या घरात घुसला व विचारल. पवार साहेबांच्या कुटुंबियांच जाऊ द्या हो मोदी साहेब, तेवढ जशोदाबेनच काय झाल सांगाना. अश्याप्रकारे, धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

उस्मानाबाद येथील महाआघाडीचे उमदेवार राणाजगजित सिंह पाटील प्रचारार्थ धनंजय मुंडे बोलत होते. शरद पवारांच्या कुटंबात पक्षाच्या श्रेय वरून वाद सुरु असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभेत केली होती. मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देत धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणातून मोदींची खिल्ली उडवली.

तुम्ही घेतलेले निर्णय काय आहे त्यावर तुम्ही का बोलत नाही. जीएसटीचा काय फायदा झाला, नोट बंदीचा काय फायदा झाला, मुद्रा योजनेचे काय झाले. कारगिल युद्ध झाले तेव्हा वाजपेयी पंतप्रधान होते, त्यांनी कधी शहीद जवानांवर मत माघीतले नाही. मात्र तुम्हाला, शहीद जवानांच्या नावावर मत मागायला लाज कशी वाटत नाही, असा टोला यावेळी धनंजय मुंडे यांनी लागवला.

लोकसभा निवडणुकीत राजकीय नेते एकमेकांवर आरोप आणि टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींच्या टीकेला धनंजय मुंडे यांनी उत्तर दिले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button