breaking-newsपिंपरी / चिंचवड

डॉ. श्रीराम लागू यांच्या श्रद्धांजली सभेचे चिंचवडमध्ये आयोजन

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

अंशुल क्रिएशन व अंधश्रद्धा निर्मूलन समिती पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने दिवंगत ज्येष्ठ अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनानिमित्त श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या शनिवारी (दि. २१) सायंकाळी पाच वाजता चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयाच्या प्रेक्षागृहात ही सभा होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील विविध सामाजिक व सांस्कृतिक संघटनांचे प्रतिनिधी या सभेमध्ये सहभागी होणार आहेत.

त्यामध्ये अंशुल क्रिएशनचे विजय जगताप, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. दीपक शहा, समितीचे राष्ट्रीय समन्वयक व सहकार्यवाह डॉ. राजेंद्र कांकरिया, ॲड. मनिषा महाजन, राष्ट्र सेवा दलाचे प्रा. सुभाष वारे, पिंपरी चिंचवड नागरी हक्क कृती समितीचे मानव कांबळे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल लांडगे, संभाजी ब्रिगेडचे संपर्क प्रमुख नकुल भोईर, लेखक श्रीकांत चौगुले, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले, मराठी भाषा संवर्धन समितीचे सदस्य संभाजी बारणे, संविधान जनजागरण अभियानाचे विष्णू मांजरे, जगद्‌गुरू प्रतिष्ठानचे ॲड. लक्ष्मण रानवडे, सहारा सोशल फौंडेशनचे प्रा. गोरख ब्राम्हणे, संत रविदास विचार मंचचे लक्ष्मण मुदळे आदी सहभागी होत आहेत. डॉ. लागू यांच्या घरी काम करणाऱ्या व दीर्घकाळ त्यांच्या सहवासात राहिलेल्या सुनंदा चव्हाण या त्यांच्या आठवणी विषद करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button