breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

डीपीच्या स्फोटात होरपळलेल्या ‘त्या’ दोघींचा २३ तासानंतर मृत्यू

भोसरी – भोसरी येथे काल दुपारी महावितरणच्या डीपीत झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या आजी आणि नातीचा आज दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, या स्फोटात जखमी झालेल्या चिमुकलीच्या आईची प्रकृती गंभीर असून तिच्यावर ससूनमध्ये उपचार सुरू आहेत.


काल दुपारी दीडच्या सुमारास भोसरीच्या इंद्रायनीनगरमध्ये ही दुर्देवी घटना घडली होती. शारदा दिलीप कोतवाल (वय ५०), अक्षदा सचिन काकडे (वय ३२), शिवन्या सचिन काकडे (वय ५ महिने) या तिघी या स्फोटात गंभीर जखमी झाल्या होत्या. डीपीला लागून असलेल्या घरात डीपीतील ऑईल उडाले. त्यावेळी अक्षदा त्यांची मुलगी शिवन्या हिला आंघोळ घालत होत्या. त्यांची आई शारदा देखील तेथेच होत्या. शारदा, अक्षदा व चिमुकल्या शिवन्या यांच्या अंगावर डीपीतील हे ऑईल उडून त्या तिघी गंभीर भाजल्या. त्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. तसेच स्फोटामुळे या परिसरात आग लागल्याने या तिघींना रुग्णालयात नेण्यास विलंब झाला. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर या तिघींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. उपचार सुरू असतानाच २३ तासानंतर शारदा कोतवाल आणि शिवन्या यांची प्राणज्योत मालवली. तर अक्षदा यांची प्रकृती अजूनही गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, काल महावितरणच्या डीपीत आग लागल्याची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. अग्निशामक दलाचे अशोक कदम, विकास नाईक आणि पुंडलिक भुतापल्ले यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत अक्षदा यांच्या घरातील सुमारे एक लाखाच्या घरगुती साहित्याचे नुकसान झाले. तसेच त्यांची दुचाकी यात जळून खाक झाली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button