डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिल्पसृष्टीचे काम लवकरच पुर्ण करणार – सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार
पिंपरी ( महा ई न्यूज ) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित शिल्पसृष्टी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात साकारण्यात येत आहे. या भीमसृष्टीत 19 म्युरल्सचा समावेश असून ते बसविण्याचे काम बुधवारी (दि.16) सुरू झाले. दोन म्युरल्स बसविण्यात आले असून उर्वरीत म्युरल्स 20 फेब्रुवारीअखेर भीमसृष्टी लोकांसाठी खुली करणार असल्याचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.
महापालिकेच्या वतीने पिंपरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला असून या पुतळ्याच्या परिसरात भीमसृष्टी या नावाने शिल्पसृष्टी साकरण्यात येणार आहे. त्यात बाबासाहेबांच्या जीवनांवर आधारित १९ प्रसंगांचा समावेश आहे. ही शिल्पे अठरा फुट बाय अकरा फुट या आकारात तयार केली आहेत. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणापासून, घटना राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द करताना आणि नागपूरच्या दिक्षा भूमीतील भाषण, महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रहासह विविध प्रसंग त्यात मांडलेले आहेत.
त्यापैकी दोन मुरल्स बसविण्यात आले असून आणखी काही दिवसात संपुर्ण 19 मुरल्स आणून बसविले जाणार आहेत. येत्या फेब्रुवारीअखेर भिमसृष्टी शहरवासियांसाठी खुली करण्याचे नियोजन आहे. तातडीने काम पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदार व कलाकृती साकारणा-या संस्थेला बुधवारी दिल्याचे एकनाथ पवार यांनी सांगतिले. यावेळी नगरसेवक नामदेव ढाके, सुलक्षणा धर, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे, शिल्पकार महेंद्र थोपटे, कार्यकारी अभियंता मनोज शेटिया आदी उपस्थित होते.