Breaking-newsपिंपरी / चिंचवड
टेम्पोच्या चाकाखाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/accident-utsav-10-696x447.jpg)
पिंपरी- रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला टेम्पोने धडक दिली. या अपघातात टेम्पोच्या चाकाखाली चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी मोशीतील बोरहाडेवाडी येथे घडली.
राजेंद्र सदाशिव चव्हाण (वय ३५, रा. बोरहाडेवाडी, मोशी) असे या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. चव्हाण हे जुना जकात नाका येथील बाजार समिती चौकातील रस्त्यावर उभे होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या (एमएच-१४, एएस-८००४) क्रमांकाचा टेम्पोने त्यांना धडक दिली. या अपघातात चव्हाण चाकाखाली सापडल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. टेम्पोचालकाला ताब्यात घेतले आहे.