“जिस देश का राजा व्यापारी, उस देश की प्रजा भिकारी” – इंधन दरवाढीवरून मनसे कार्यकर्त्यांचा संताप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/addeb2c7f51816c0213ea42dd06e5a88_XL.jpg)
- पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सरकारविरोधात मनसेने केले आंदोलन
पिंपरी – ‘जिस देश का राजा व्यापारी, उस देश की प्रजा भिकारी’ या म्हणीचा पुरेपूर प्रत्यय येणारा कारभार सध्या देशात सुरु आहे. जिथे जिथे जनतेला लुटता येईल, तिथे तिथे लुटण्याचा उद्योग केंद्र आणि राज्य सरकार करत आहे, अशा शब्दात मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी इंधन दरवाढीबाबतचा रोष व्यक्त केला.
पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्त शहर मनसेने आज शनिवारी (दि. 26) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करत राज्य व केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी आंदोलनात सचिव राजू सावळे, सचिव रुपेश पटेकर, उपशहराध्यक्ष चंद्रकांत दानवले, भोसरी विधानसभा अध्यक्ष विशाल मानकरी, अंकुश तापकीर, महिला सेनेच्या शहर उपाध्यक्ष आश्विनी बांगर, विभाग अध्यक्षा अनिता पांचाळ आदी सहभागी झाले होते.
चिखले म्हणाले की, गेल्या दहा दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज भडकत आहेत. मोदी सरकारने सलग अकरा दिवस पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ केली. कर्नाटक राज्यात सत्ता न मिळाल्यामुळे देशभरातील जनतेवर हे सरकार भाववाढ करुन वचपा काढत आहे की काय, या भाववाढीमुळे गृहिणींना कुटुंबाचा खर्च भागविणे अशक्य झाले आहे.