breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हेल्मेट सक्तीवर बोलण्यास पालकमंत्री बापट यांचा नकार

पुणे, (महा-ई-न्यूज) – हेल्मेट सक्तीने मंत्री महोदयांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. त्यांनाही हा विषय चर्चेसाठी नको असा झाला आहे. खुद्द पालकमंत्री गिरीश बापट यांनी सुध्दा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हेल्मेट सक्तीच्या विषयावर काहीही बोलू नका, अशा सूचना उपस्थित खासदार, आमदारांना दिल्या. त्यामुळे पुणेकरांच्या मानगुटीवर हेल्मेट सक्तीचे भूत कायम राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधान भवनात पार पडली. या बैठकीला शहर आणि ग्रामीण भागातील खासदार, आमदार, अधिकारी आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. गेल्या महिनाभरापासून पुणे पोलिसांकडून हेल्मेट सक्ती करण्यात आली. या निर्णयाचा विरोध करत अनेक सामाजिक संघटना रस्त्यावर उतरत आहेत.

हेल्मेट सक्तीच्या विषयावर बैठकीत चर्चा होणे अपेक्षित असताना पोलीस विभागाच्या चर्चेच्या सुरुवातीला पालकमंत्री गिरीश बापट यांनी सर्व पदाधिका-यांना हेल्मेट सक्ती सोडून इतर काहीही विचारा. त्यावर चर्चा केली जाईल. त्यामुळे शहरातील कोणत्याही लोकप्रतिनिधीने हेल्मेट सक्तीच्या प्रश्नावर भूमिका मांडली नाही. हेल्मेट सक्तीवर चर्चा न करणे म्हणजे पुणेकरांच्या मानगुटीवर हेल्मेट सक्ती लादली जाणार असल्याचे दिसते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button