जागतिक महिला दिनानिमित्त वाकड पोलिसांच्या वतीने ‘महिला सक्षमीकरण रॅली’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/wakad-police-mahila-din.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वाकडृ पोलिसांनी वाकडमध्ये महिला सक्षमीकरण रॅली काढण्यात आली. यामध्ये परिसरातील सोसायट्यांमध्ये राहणा-या महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. तसेच, वरिष्ठ पोलीस अधिकारी, कर्मचारी, विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थिनी यांचाही सहभाग होता. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी देखील या रॅलीमध्ये आवर्जून सहभाग घेतला.
महिला सक्षमीकरण पायी रॅलीची सुरुवात शनिवारी (दि. 7) सकाळी वाकड पोलीस ठाण्यापासून झाली. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उप आयुक्त विनायक ढाकणे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. रॅलीमध्ये डी. वाय. पाटील कॉलेज, लोकमान्य टिळक विद्यालय, गणेशनगर थेरगाव, माध्यमिक विद्यालय थेरगाव, माध्यमिक विद्यालय वाकड गावठाण, ब्लॅक कोब्रा कमांडो स्कूल सांगवी यांचे प्लाटून, वाकड परिसरातील हाऊसिंग सोसायट्यांमधील महिला सहभागी झाल्या. 500 हून अधिक विद्यार्थिनी आणि महिलांनी रॅलीत सहभाग घेतला.
या रॅलीची सुरूवात वाकड पोलीस स्टेशन पासून झाली. पुढे वाकड रोडने जानोबा चौक, माउली चौक, उत्कर्ष चौक, वाकड चौक, मानकर चौक, यशोदा मंगल कार्यालय वाकड या मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. कार्यालयात महिला सक्षमीकरण मेळावा घेण्यात आला. मेळाव्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत येसूबाई महाराणी यांची भूमिका साकारणा-या प्राजक्ता गायकवाड प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर, अध्यक्षस्थानी अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे उपस्थित होते. मेळाव्यासाठी उप आयुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवताळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, पोलीस कर्मचारी हनुमंत राजगे, सुदर्शन कापरे, बाळासाहेब पन्हाळे, बापूसाहेब धुमाळ, बिभीषण कन्हेरकर, तुषार साळुंखे, नितीन गेंगजे, हेमंत हांगे, सागर सूर्यवंशी, श्रुती सोनवणे, मोहिनी थोपटे आदींनी परिश्रम घेतले.