‘जनता कर्फ्यू’ असताना करोनाग्रस्त शोधण्यासाठी शिक्षकांचे पथक रस्त्यावर, Dr. Roy यांचा मनमानी आदेश
![बोगस एफडीआर प्रकरण; 'त्या' ठेकेदारावर फाैजदारीचे आदेश](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pcmc-1-2.jpg)
– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाला फासला हरताळ
– संपूर्ण भारत बंद असताना Dr. Roy यांना सूचले शहानपण
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत करोना निर्मूलनासाठी Rapid Response Team तयार केल्या आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अज्ञान असलेल्या शिक्षकांची नेमणूक केली आहे. त्यातच आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यु पाळण्याचे आदेश दिले होते. जनता कर्फ्यूमध्ये या सिमेंटच्या जंगलात माणूसच काय तर चिट पाखरू देखील रस्त्यावर नव्हते. संपूर्ण शहरात सन्नाटा असताना महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी Dr. Anil Roy यांनी मनमानी करत शिक्षकांच्या पथकाला करोना रूग्ण शोधण्याचे आदेश दिले. Roy यांनी मनमानीपने आदेश काढल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाला हरताळ फासला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत गेला. परदेशातून आलेल्या नागरिकांना याची बाधा झाल्याने वेळीच परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. करोनाग्रस्थांची माहिती शोधून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यासाठी Rapid Response Team तयार केल्या आहेत. त्यामध्ये एकुण २८७ कर्मचा-यांचा सहभाग आहे. त्यामध्ये महापालिकेच्या प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, क्रिडा आणि आयटीआयच्या २०२ शिक्षकांची नेमणूक केली आहे.
घरोघरी जाऊन हे शिक्षक माहिती संकलित करत आहेत. परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती, करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींची माहिती, संशयित रुग्ण आदींची माहिती संकलित करून त्या त्या विभागातील आरोग्य निरीक्षकांना अहवाल कळविण्याचे काम शिक्षक करत आहेत. हे काम करताना शिक्षकांना आरोग्याच्या सुरक्षेसाठी किट देण्यात आलेली नाही. जर एखाद्या शिक्षकाला या भयंकर विषाणुचा संसर्ग झाल्यास त्याच्या जिवावर बेतू शकते. हा शिक्षक शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार असतो. त्यांच्यापासून विद्यार्थ्यांना देखील धोका होण्याची शक्यता आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून याचे गांभीर्य पालिकेच्या वैद्यकीय विभागाला राहिलेले नाही.
अशातच आज रविवारी (दि. २२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन देशातील सर्व नागरिकांना केले होते. नागरिक जनता कर्फ्यु पाळत असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी Dr. Roy यांनी Rapid Response Team मधील शिक्षकांच्या पथकाला स्वतंत्र आदेश काढून कामावर हजर राहण्यास भाग पाडले. त्यामुळे कामासाठी बाहेर पडलेल्या शिक्षकांच्या पथकाला हकनाक नागरिकांच्या रोषाला बळी पडावे लागले.
पथकातील शिक्षकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार
Dr. Roy यांनी पथकातील शिक्षकांना आज सकाळी आठ वाजता यमुनानगर रूग्णालयात हजर राहण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकातील १५ जण सकाळी वेळेत त्याठिकाणी हजर राहिले. त्यावेळी त्यांनी Dr. Roy यांना जनता कर्फ्युची आठवण देखील करून दिली. तरी, त्यांनी पथकाला सर्वेक्षनासाठी पाठवले. शिक्षक सर्वेक्षणाचे काम करताना नागरिकांनीच त्यांना उलट प्रश्र्न करण्यास सुरुवात केली. जनता कर्फ्यु असताना तुम्ही आम्हाला माहिती कशी विचारू शकता, असे म्हणत त्यांनी शिक्षकांशी हूज्जत घातली. Dr. Roy यांच्या मनमानीमुळे शिक्षकांचे आरोग्य तर धोक्यात आलेच आहे, पण त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मारही सहन करावा लागत आहे.