breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

छोटा राजनच्या भावाला ‘महायुती’चं तिकीट, कमळ चिन्हावर फलटणमध्ये लढणार

पुणे – अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचे बंधू दीपक निकाळजे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून (आठवले गट) उमेदवारी देण्यात आली आहे. ते फलटणहून निवडणूक लढवणार आहेत. विशेषता ते कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.

भाजप-शिवसेना मित्र पक्षाच्या महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर होत आहे. मित्रपक्षासाठी भाजप-शिवसेनेने 18 जागा सोडल्या. त्यातील सहा जागा ह्या ‘रिपाइं’ आठवले गटाला दिल्या आहेत. त्यात रिपाइंने चार उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये दीपक निकाळजे यांना फलटणची जागा देण्यात आली आहे. मुंबईतली एक जागा रिपाइंला मिळाली आहे. त्या जागी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील फलटण ;सोलापुरातील माळशिरस ; विदर्भात भंडारा ; मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातील नायगाव; परभणी जिल्ह्यातील पाथरी तसेच मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर या ६ जागा रिपाइंला सोडण्यात आल्या आहेत. असे रिपाइंचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, माळशिरसची जागा बदलून पुणे कॅन्टोन्मेंट ही जागा देण्यात यावी अशी सूचना रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

मानखुर्द शिवाजीनगर (मुंबई) – गौतम सोनावणे

फलटण (सातारा) : दीपक निकाळजे

पाथरी (परभणी) : मोहन फड

नायगाव (नांदेड): राजेश पवार

माळशिरस (सोलापूर)

भंडारा (विदर्भ)

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button