Breaking-newsपिंपरी / चिंचवड
चिंचवड येथे दुकानांची शटर उचकटून चोरट्यांनी चार मेडिकलची दुकाने फोडली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/13.jpg)
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
चिंचवड येथे दुकानांची शटर उचकटून चोरट्यांनी चार मेडिकलची दुकाने फोडली. ही घटना बुधवारी (दि. १) पहाटे घडली. लॉकडाउनच्या काळात चोरट्यांचा मुक्त संचार असल्याचे यावरून दिसून येते. सन्मती मेडिकल, महावीर मेडिकल, रिव्हायवल मेडिकल आणि आणखी एक दुकान (नाव समजू शकले नाही) अशी फोडलेल्या दुकानांची नावे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी चिंचवड गावातील चार औषधाची दुकाने फोडली. शेवटचे रिव्हायवल हे या दुकानाचे शटर उचकटत असताना समोरील इमारतीमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाने चोरट्यांना हटकले. यामुळे चोरटे दुचाकीवरून पळून गेले, असेही पोलिसांनी म्हटले आहे. चिंचवड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.