चिंचवडमध्ये वाहनांची तोडफोड
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/crime-red-theme-1.jpg)
पिंपरी – पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयावरून एका टोळक्याने चार वाहनांची तोडफोड केली. ही घटना रामनगर समोर, चिंचवड येथे बुधवारी रात्री घडली.
सागर झोंबाडे, अभिषेक घनघाव, सुप्रीम काळे, अजय बारस्कर, दीपक गिरी (सर्व रा. दत्तनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अमित प्रकाश बाबर (रा. मोहननगर, चिंचवड) यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विद्यानगरच्या समोरील बाजूस काही जण रस्त्यावर दारू पीत बसले असल्याची माहिती बुधवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास पोलिसांना मिळाली. यामुळे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आल्याचे पाहताच दारुड्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर थोड्या वेळाने आसपासच्या ट्रक चालकांनी पोलिसांना माहिती दिल्याचा समज आरोपीचा झाला. त्यांनी आसपासच्या चार वाहनांची तोडफोड करत दहशत निर्माण केली. याबाबत अधिक तपास निगडी पोलिस करीत आहेत.