Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
घरेलू महिला कामगार काँग्रेसतर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम
![Domestic Women Workers Congress Tarpe Hindi Kunkwacha Program](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/gharelu-mahila.jpg)
पिंपरी | प्रतिनिधी
असंघटित कामगार कॉंग्रेस पिंपरी चिंचवड शहर संलग्न घरेलू महिला कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर यांच्या तर्फे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुंदर कांबळे शहराध्यक्ष असंघटित कामगार काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर यांच्या मार्गदर्शनाने आनंदनगर वार्ड अध्यक्ष नीलम गवळी, घरेलू महिला कामगार काँग्रेस यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
या वेळी वॉर्डस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला शितल कोतवाल समन्वयक महाराष्ट्र प्रदेश घरेलू महिला कामगार काँग्रेस प्रमुख उपस्थिती होत्या. या वेळी तेथील आरोग्यविषयक तसेच पाणी व सुरक्षा व्यवस्था या समस्यांबाबत महिलांनी तक्रारी व्यक्त केल्या. त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यापुढील काळात पक्ष संघटना बाबतीत त्यांच्याशी चर्चा करण्यात आली