breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

घरगुती गणपती बाप्पाला पाच दिवशी भक्तीमय वातावरणात निरोप

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील पवना, इंद्रायणीसह पालिकेने बनविलेल्या हाैदाच्या विर्सजन घाटावर पाच दिवसांच्या घरगुती गणपती बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. 

पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड, वाकड, पिंपळे सौदागर, रावेत, चिखली, मोशी, पिंपळे गुरव, काळेवाडी अशा सर्व घाटांवर महापालिकेच्या वतीने कृत्रिम विसर्जन घाट बांधण्यात आले आहेत. नागरिक देखील नदीमध्ये गणेश विसर्जन करण्याऐवजी कृत्रिम विसर्जन घाटांवर पर्यावरण पूरक पद्धतीने विसर्जन करण्यावर भर देत आहेत. महापालिकेच्या वतीने सर्व विसर्जन घाटांवर कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच पोलिसांचा देखील शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका, कमिन्स इंडिया आणि गो विज्ञान संस्था यांच्या वतीने पिंपळे सौदागर येथील घाटावर नागरिकांना पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. तसेच गणेश मूर्तींच्या गळ्यातील आणि पूजेचे साहित्य जमा करण्यासाठी देखील सर्वांचे सहकार्य मिळत आहे. शहरातील विविध सामाजिक आणि पर्यावरण प्रेमी संस्था गणेश उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button