Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
गोपीनाथ मुंडे साधक आश्रमाचे खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/123.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
लोकनेते गोपीनाथ मुंडे साधक आश्रमाचा भूमिपूजन समारंभ आळंदी येथील केळगाव याठिकाणी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, उपमहापौर केशव घोळवे, नगरसेविका योगीता नागरगोजे, आळंदीच्या नगराध्यक्षा वैजयंती उमरगेकर, अशोक कांबळे, हभप मारुती तांदळे, हभप पांडुरंग महाराज विघ्ने, उद्योजक अशोक हांडे, जगन्नाथ शिंदे, सामाजिक कार्यकर्ते आबा नागरगोजे, जय भगवान महासंघाचे पुणे शहराध्यक्ष गणेश ढाकणे, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, कैलास सानप, महादेव खाडे आदी यावेळी उपस्थित होते.