breaking-newsपिंपरी / चिंचवड

गया फाऊंडेशन आणि मराठवाडा विकास प्रतिष्ठानच्या वतीने महिलांचा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगारी करणा-या नामवंत महिलांचा गया फाऊंडेशन आणि मराठवाडा विकास प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात कार्यक्रम पार पडला. यावेळी स्वराज्य शांतीदूत परिवार संस्थेचे उद्घाटन झाले. स्वराज्य महिला विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले. यावेळी मधुमित्त निर्मित व मधुसुदन ओझा प्रस्तुत रजनीगंधा कार्यक्रमाचे सादरिकरण झाले. प्रा. रविंद्र गायकवाड, विठ्ठलराव जाधव, लातूरचे आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, मराठवाडा मित्र मंडळाचे भाऊसाहेब जाधव, पोलीस उपायुक्त सुहास बावाचे, उदयपूरचे सरपंच माधवराव पाटील, पूजा महेश लांडगे, शुभांगी लांडे, विद्या जाधव आदींच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करण्यात आले.

समाजाचे ऋण फेडणा-या आदर्श स्त्री, आदर्श मातांचा गुणगौरव करण्यात आला. तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ गावच्या विमलबाई धुरगुडे, धारूर मोर्डा गावातील शकुंतला पवार, लातूरच्या धन्वंतरी गोजमगुंडे, अंबाजोगाई येथील शालिनी चौधरी, बार्शीच्या द्रौपदी काळे-चारे यांना आदर्श माता पुरस्काराने गौरविण्यात आले. स्त्री रोग तज्ञ डॉ. अंबिका पतंगे, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, प्रतिभा कव्हेकर पाटील, डॉ. दीपा मोरे, अंजली तापडिया, प्रीती काळे, उपजिल्हाधिकारी पूजा गायकवाड, आशा सूर्यवंशी-मुठे, सुरेखा शेडे, लोकसेवा फाऊंडेशनच्या स्नेहल शहाणे, अॅड. प्रीती वैद्य, अर्चना अंबुरे, पोपटबाई जाधव, रिंका जाधव, अदिती साखरे, अनिता खांदवे-कराळे, निता मोघे, प्रतिक्षा इंगोले यांन समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी प्रा. जीवन जाधव, प्रा. गोरख घोडके, शिवानंद बुदले, प्रा. अभयकुमार हिरास, डॉ. सागर पतंगे, प्रा. मारुती खमितकर, प्रा. शेषेराव पवार, प्रा. सुनील बेळमकर, प्रा. व्यंकट झिंगाडे, योगेश शालगर, मोहन सूर्यवंशी, सूर्यकांत कुरूलकर, वामन भरगंडे, माधव मनोरे, सुनील काकडे आदी यावेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button