गणेश विसर्जनासाठी पिंपरीच्या वाहतुकीत बदल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/1_1497931312.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – गणेशोत्सवाचे रविवारी (दि. 23) विसर्जन होणार आहे. बाप्पाला निरोप देण्यासाठी शहराच्या सर्व भागातून गणेशभक्त पिंपरीमध्ये येतात. त्यामुळे पिंपरी भागात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच शहरातील गणेश मंडळांच्या मिरवणुका निघत असल्याने वाहतूक व्यवस्था ठप्प होते. यासाठी वाहतूक पोलिसांनी रविवारी दुपारी दोनपासून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
विसर्जनादिवशी मिरवणुका पाहायला येणाऱ्या नागरिकांना त्यांची वाहने पिंपरीतील साई चौक भूयारी मार्गाजवळील मोकळ्या जागेत, क्रोमा शोरुम जवळ पिंपरी पुलाच्या जवळील मोकळ्या जागेत व पिंपरी भाजी मंडई शेजारी अशा तीन ठिकाणी पार्क करता येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीदरम्यान पिंपरी परीसरातील तीन रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत.
असा असेल वाहतूकीत बदल
# पिंपरी पुलावरून चौकाकडे जाणारा मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग – पिंपरी पुलावरून उजवीकडे वळून भाटनगर मार्गे चिंचवडकडे वळवण्यात येणार आहे.
# काळेवाडी पुलावरून येणारी वाहने डिलक्स चौक व कराची चौकातील रस्ता बंद.
पर्यायी मार्ग – काळेवाडी स्मशानभूमी चौकातून उजवीकडे वळून जमतानी चौक व गेलार्ड चौकाकडे वळवून डेअरी फार्म मार्गे मुंबई-पुणे महामार्गाकडे वळवणे.
# पिंपरी चौकात गोकूळ हॉटेलकडे जाणारा रस्ता बंद.
पर्यायी मार्ग-पिंपरी सर्व्हीस रोडने वाहने वळवण्यात येणार आहेत.
# मुख्य मिरवणूक वेळी पिंपरी चौकातून येणारी पिंपरी पुलावरील वाहने शगुन चौकाकडे न जाता ती उजवीकडे वळवली जातील.
# काळेवाडी बाजूची वाहने डिलक्स व कराची चौकातून वळवण्यात येणार आहेत.
# गर्दी वाढल्यास मुंबई-पुणे महामार्गावरील वाहनांना पिंपरीत प्रवेश बंद करण्यात येणार असून त्यांना सर्व्हीस रोडने वल्लभनगरकडे वळवण्यात येईल.