breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

गट-तट विसरुन कामाला लागा – खासदार श्रीरंग बारणे

– थेरगाव मध्ये खासदार श्रीरंग बारणे यांची बैठक संपन्न
पिंपरी – मागील काही दिवसात नकळत कुणाकडून चुका झाल्या असतील. त्यावरून हेवेदावे, मतभेद झाले असतील, तर ते सर्व विसरून एकोपा जपा. आता प्रत्येकाने तत्परतेने कामाला लागले पाहिजे. लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे योग्य हातामध्ये देशाची सूत्रे देण्यासाठी प्रत्येकाने कामाला लागा, असे आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.
थेरगावातील गावक-यांची खासदार श्रीरंग बारणे यांनी बैठक घेतली. बैठकीत गावक-यांशी चर्चा करताना ते बोलत होते. यावेळी नगरसेवक विजय बारणे, नंदू बारणे, संपत पवार, विमल जगताप, कांतीलाल गुजर, हभप सुदाम बारणे आदी उपस्थित होते. बैठकीत सर्व गावक-यांनी एकमताने खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा देण्याचा संकल्प केला.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “आपण सर्वांनी विश्वास दाखवून खासदार म्हणून निवडून देऊन देशसेवेची संधी दिली. आपला विश्वास सार्थ ठरवत देशाच्या संसदेत विशेष ठसा उमटवला. विविध विकासकामे आणि योजना दूरदृष्टीने राबवल्या. हे काम करत असताना आपण दाखवलेला विश्वास कायम स्मरणात आहे. शहरातून विरोधी पक्ष हद्दपार होत आहे. मावळ लोकसभा मतदार संघात एकंदर अशाच प्रकारची परिस्थिती आहे. आपण करत असलेल्या कामाचे हे फळ आहे. सर्वांचा विश्वास सार्थ ठरवून यापुढे देखील चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन खासदार बारणे यांनी उपस्थितांशी बोलताना केले. ‘माणसे जोडणे आणि कामातून त्यांना न्याय देणे’ हे सूत्र सर्वांनी पाळण्याचा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button