खिंवसरा पाटील शिक्षण संकुलामध्ये दानशूर व्यक्तिमत्वांच्या संगतीने रंगला प्रजासत्ताक दिनाचा सोहळा
![Rangala Republic Day Celebration with Khinvasara Patil Education Complex](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/1-1.jpg)
पिंपरी |
रोटरी क्लबच्या माजी अध्यक्षा प्रा.शैलजाताई सांगळे, लायन्स क्लब ऑफ फिनिक्स पुणेचे अध्यक्ष मकरंद शाळीग्राम, सेक्रेटरी प्रदीप वडगावकर, सामाजिक कार्यकर्ते सुभाष चव्हाण, कवयित्री संगीता शाळीग्राम, माजी उपमहापौर झामाबाई बारणे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे कोषाध्यक्ष संजय कुलकर्णी, शाला समिती अध्यक्षा डाॅ. निताताई मोहिते, शाला समिती अध्यक्ष नितीन बारणे, मुख्याध्यापक नटराज जगताप, प्रभारी मुख्याध्यापिका अश्विनीताई बाविस्कर सर्व शिक्षक वृंद, थेरगाव सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते अनिकेत प्रभु, राहुल सरवदे व अन्य माजी विद्यार्थी आणि निबंध लेखन स्पर्धेतील बक्षीस प्राप्त विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ७२ व्या प्रजासत्ताकदिन सोहळ्यानिमित्त भारतमाता पूजन व ध्वजवंदन कार्यक्रम संपन्न झाला.
राष्ट्रगीत, ध्वजगीत गायनाने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. मुख्याध्यापिका अश्विनी बाविस्कर यांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले आहे. यावेळी इ. ५ वी ते ८ वी साठी रोटरी क्लब तर्फे घेण्यात आलेल्या ‘पवनामाई माझी माता’ या निबंध लेखन स्पर्धेतील दहा यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले आहे. कोरोना संकटाचे मळभ दूर होत पुन्हा नव्या उमेदीने शाळा सुरु होण्याच्या मार्गावर असल्याने आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी लायन्स क्लब ऑफ फिनिक्स पुणे यांच्या वतीने शाळेसाठी ऑक्सीमीटर तर स्वाधार IWC पुणे तर्फे बायोमेट्रिक युनिट व सॅनिटायझर युनिट शाळेला भेट देण्यात आले. तसेच विन्सस्पेक्ट टेक्नाॅलाॅजी प्रायव्हेट लिमिटेडचे M.D. दिपक पिंगळे यांच्या वतीने दत्तक पालक योजनेअंतर्गत सहा विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत देण्यात आली.
तर सामाजिक कार्यकर्ते सुभाष चव्हाण यांच्या वतीने शाळेतील गायक कलाकार विद्यार्थिनी कु.संचिता काशीद हिच्या गायन कलेला प्रोत्साहनपर आर्थिक मदत देण्यात आली. तसेच शाळेतील ग्रंथालयासाठी सुद्धा त्यांनी काही पुस्तकांची भेट दिली.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते सुभाष चव्हाण म्हणाले, सीमेवर लढणारे जवान महत्त्वपूर्ण आहेतच. मात्र प्रत्येकजणाला सीमेवर जावून लढायची गरज नाही. खरं तर भारतातील प्रत्येक नागरिकाने आपापले कर्तव्य जबाबदारीने बचावले तर ती सुद्धा देशभक्तीच आहे.