खासदार श्रीरंग बारणे यांच्या विकास निधीतून विकासकामांचा धडाका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/120359587_3320740677973432_4472119308772716149_o.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या विकास निधीतून पिंपरी-चिंचवड शहरात विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला आहे. चिंचवड येथील विविध गृहनिर्माण सोसायटी आणि निगडी, प्राधिकरणातील गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात पेव्हिंग ब्लॅाक बसविण्यास सुरुवात झाली आहे. खासदार बारणे यांच्या हस्ते रविवारी (दि.27) ठिकठिकाणी भूमीपूजन करण्यात आले.
शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्या पुढाकाराने चिंचवड येथील विविध गृहनिर्माण सोसायटीत खासदार निधीतून पेव्हिंग ब्लॅाक बसविण्याचे काम हाती घेतले आहे. सुखकर्ता सोसायटीत रविवारी खासदार बारणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी गजानन चिंचवडे, अश्विनी चिंचवडे, प्रकाश मिठभाकरे, गर्जेकाका तसेच सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लक्ष्मीगंगा, मोरू सोसायटी, श्री सोसायटी, रघुवंश सोसायटी, केतकी सोसायटी 13 लाख रुपये, संत गार्डन सोसायटी व यशोधन सोसायटी 12 लाख, चिंचवड मधीलच संत गार्डन सोसायटी व यशोधन गृहनिर्माण सोसायटीत 15 लाख रुपयांच्या पेव्हिंग ब्लॅाकचे काम करण्यात येणार आहे, निगडी, प्राधिकरणातील गंगानगर परिसरात पेव्हिंग ब्लॅाक बसविण्यास सुरुवात केली आहे. इंडियन कार्ड सोसायटी व साईकृपा गृहनिर्माण सोसायटीत 15 लाख रुपयांची कामे सुरू केली आहेत. भाजप नगरसेविका शर्मिला बाबर, राजेंद्र बाबर, अमोल निकम यांसह सोसायटीतील नागरिक उपस्थित होते.