खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये पार्थ पवारांनी ‘माॅर्निंग वाॅक’ला येणा-या मतदारांशी साधला संवाद
पनवेल – मावळ लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे नातू पार्थ पवार आज सकाळीच खारघरमधील सेंट्रल पार्कमध्ये आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. रविवार सुटीचा दिवस असल्याने पार्कमध्ये मॉर्निंग वॉकला येणाऱ्या मतदारांशी संवाद साधण्यासाठी 8 च्या सुमारास पार्थ पवार पार्कमध्ये आले होते.
कधी ट्रेनने प्रवास करीत चाकरमानी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, तर प्रचारात वेगवेगळे फंडे वापरुन मतदारपर्यंत पोहोचण्यासाठी कधी रिक्षाने प्रवास, घोड्यावर सवारी, रस्त्यावर धावाधाव, भजन, पंगतीला जेवण वाढण्यासारख्या गोष्टींमुळे सतत सोशल मीडियावर आणि मतदारामध्ये चर्चेचा राहिले आहेत.
पार्थ पवारांनी आज (रविवारी) सकाळी खारघरमध्ये नागरिकांशी संवाद साधला. यावेळी खारघर शहरातील युवक काँग्रेसचे अध्यक्ष रुपेश घरत व आघाडीचे काही कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते. मॉर्निंगवॉकला आलेल्या नागरिकांना आपली ओळख पटवून देत मतदानाचे आवाहन केले. यावेळी नागरिकांनी देखील पार्थ यांच्याशी संवाद साधला.