breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

खंडीत वीज पुरवठ्यामुळे एमआयडीसीतील उद्योजक त्रस्त

वीज पुरवठा सुरळीत करा, फोरम आॅप स्माॅल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनची मागणी 
पिंपरी –  भोसरी व इतर एमआयडीसी परिसरामध्ये खंडित वीजपुरवठ्यापासून विविध समस्यांनी उद्योजक त्रस्त आहेत. शासनदरबारी हे प्रश्‍न सोडविले जात नाहीत. त्यामुळे उद्योजकांचे प्रश्‍न त्वरीत सोडवावेत, अशी मागणी  फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीने करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसराला नव्याने नियुक्ती झालेले चीफ इंजिनिअर एस. आर. वाघ यांनी पिंपरी-चिंचवड एमआयडीसी परिसराला भेट दिली. परिसराची पाहणी केली.
त्या वेळी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय सोपानराव भोर आणि उपाध्यक्ष गणेश जामगावकर यांनी एमआयडीसीमध्ये त्यांचे स्वागत केले. एमआयडीसी परिसरात असलेल्या उद्योजकांच्या अडचणी बाबत माहिती दिली. त्वरीतच एमआयडीसीतील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यात येतील, असे आश्‍वासन दिले. या वेळी एमआयडीसीचे अधिकारी, एमआयडीसीचे मुख्य अभियंता, उपअभियंता आदी या वेळी उपस्थित होते.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button