‘कोविड-19’ परस्थितीत मतिमंद, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या होणार स्पर्धा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/3-6.jpg)
स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी सुमारे आठ लाख रुपयाला मंजूरी
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्गाचा विळखा वाढू लागला आहे. दररोज शेकडो रुग्ण पाॅझिटिव्ह सापडत आहे. काहींना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. या परस्थितीत महापालिकेच्या स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी कोणताही विचार न करता शहरातील मतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यास मान्यता दिली. त्या स्पर्धेवर सुमारे आठ लाख रुपये खर्च होणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीने केलेल्या ठराव क्रमांक 82 नूसार साई संस्कार संस्था, चिंचवड यांच्या सहकार्याने सन 2019-2020 मध्ये स्वामी विवेकानंद क्रीडांगण, महात्मा फुलेनगर चिंचवड येथे मतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यासाठी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी 9 लाख 41 हजार रुपये खर्चास अथवा प्रत्यक्ष येणा-या खर्चास मान्यता दिली.
तसेच सहभागी शाळांना भेटवस्तू, मेडल्स खरेदी, पी.व्ही.सी.फ्लेक्स बॅनर्स, स्पर्धा काळात विद्यार्थी खेळाडू, पंच अल्पोहार व भोजन यासह विद्युत स्पीकर, माईक, जनरेटर व्यवस्था खर्च हा विद्युत विभाग, क्षेत्रीय कार्यालय, स्टेज, मंडप, टेबल खुर्च्या व्यवस्था खर्च हा स्थापत्य विभाग संबंधित क्रीडा विभागाचा होणारा 7 लाख 76 हजार हा खर्च क्रीडा विभाग क्रीडा निर्धी आयोजित क्रीडा स्पर्धा, खेळाडू, विद्यार्थ्यांना सकस आहार या लेखाशिर्षातून खर्ची टाकणेस स्थायी समितीने मान्यता दिली आहे.