कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एचए कंपनी जागेवर ‘बाॅयो मेडीकल वेस्ट’ उघड्यावर; नागरिकांच्या जीवाशी खेळ!
![The opening of ‘Bio Medical Waste’ on the HA company premises in the wake of the corona infection; Play with the lives of citizens!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/WhatsApp-Image-2021-02-18-at-1.42.56-AM-1.jpeg)
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरीतील नेहरुनगर परिसरात एचए कंपनी जागेवर ‘बाॅयो मेडिकल वेस्ट’ कचरा उघड्यावर टाकला असल्याचे (गुरुवारी दि.18) उघडकीस आले आहे. जैविक कचरा टाकून नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. परंतू, महापालिका हद्दीतील जैविक कचरा उचलणा-या ‘पाॅस्को’ कंपनी ठेकेदार रुग्णालये, दवाखान्याकडून जैविक कचरा गोळा करते, तरीही हा कचरा उघड्यावर टाकून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणा-या संबंधिताचा शोध घेवून तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होवू लागली आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरात पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या परिस्थितीत जैविक कचरा गोळा करुन विल्हेवाट लावण्याबाबत शासनाने निर्देश घालून दिले आहेत. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाकडे पालिकेचे व खासगी रुग्णालये, दवाखाने या नोंदणीधारकाकडून जैविक कचरा गोळा करण्यात येतो. शहरातील खाजगी आणि शासकीय रुग्णालये, दवाखान्यांमध्ये निर्माण होणारा जैविक वैद्यकीय कचरा योग्य पध्दतीने उचलला जात नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयातील हा कचरा उघड्यावर टाकला जात आहे. दरम्यान, जैविक कचरा उघड्यावर टाकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणा-यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
तसेच जैविक वैद्यकीय कचरा अर्थात बायो मेडिकल वेस्ट नष्ट करण्यासाठी महापालिकेने मोशी कचरा डेपो या ठिकाणी प्रकल्प उभारणे, त्याचे संचालन 15 वर्षे करणे, हे काम पास्को या ठेकेदार कंपनीस दिले आहे. मात्र, रुग्णालये, दवाखान्यांचा सर्व कचरा कचरा उघड्यावर टाकला जात आहे. पाॅस्को या ठेकेदार कंपनीकडे जैविक कचरा गोळा करुन नष्ट करण्याचे काम देताना मोठा भ्रष्टाचार झाला आहे. करारनाम्यातील अटी-शर्तीचा बदल करुन ठेकेदार कंपनी डोळ्यासमोर ठेवून हे काम दिले आहे. त्यामुळे उघड्यावर जैविक कचरा टाकून काही रुग्णालये नागरिकांच्या आरोग्याशी खेळू लागले आहेत.