कोरोना बाधीत व्यक्तिचा पोलीस ठाण्यात शिरकाव, आख्खे पोलीस ठाणे धुवून काढले
![Death threats from former mayor](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pimpri-chinchwad-police-commissionarate.jpg)
पिंपरी| महाईन्यूज| प्रतिनिधी
भोसरीच्या एका नूतन पोलीस ठाण्यात करोनाबाधित व्यक्ती फिरून गेल्याने पोलिसांची चांगलीच घबराट उडाली आहे. त्यानंतर संबंधित पोलीस ठाणे निर्जंतुक करण्यात आले असून योग्य ती काळजी घेतली जात आहे. मात्र, त्या व्यक्तीला स्वत: करोनाबाधित असल्याचे माहिती नसल्याने पोलिसांचा नाईलाज झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या २४ तासांत दोन करोना बाधित रुग्ण आढळले आहेत. यांपैकी, एका रुग्णाचे पिंपरी-चिंचवड शहरात चिकनचे दुकान आहे. हीच व्यक्ती आपलं दुकान सुरु ठेवण्याबाबत परवानगी घेण्यासाठी एका पोलीस ठाण्यात गेली होती. दोन दिवसांत त्यानं दोन ते तीन वेळेस या पोलीस ठाण्याला भेट दिली. त्यानंतर बुधवारी रात्री तो करोनाबाधित असल्याचं निष्पन्न झालं आणि पोलीस प्रशासन खडबडून जागं झालं.
दरम्यान, ही व्यक्ती कोणाच्या संपर्कात आली होती का? याचा शोध घेणं गरजेचं असून संबंधितांना क्वारंटाइन होण भाग पडणार आहे.