Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीपिंपरी / चिंचवड
कोरोना काळात कर्तव्य बजावणा-या अधिकारी, कर्मचा-यांना पालिकेचा प्रोत्साहन भत्ता
![# Covid-19: Increase the number of ventilators in municipal hospitals; Suggestions to the Commissioner of Mayor Usha alias Mai Dhore](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Usha-Dhore-1.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
कोरोनामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीत देखील जिवाची पर्वा न करता कामावर हजर राहून आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडल्याबद्दल अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय कर्मचारी यांना दैनंदिन १५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात कोरोना (कोविड-१९) विषाणूचा वाढत्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध प्रतीबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत काम केलेल्या कर्मचा-यांना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर येणे-जाणे, जेवण-खाण आदींसाठी हा प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले.