Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
कोरोनासंदर्भात दिलासा, पिंपरी चिंचवडमध्ये 278 रुग्णांच्या चाचण्या निगेटिव्ह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pcmc-commissioner.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
पिंपरीमधून कोरोनासंदर्भात दिलासादायक घटनासमोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 278 रुग्णांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. सर्व रुग्ण ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांनी कोणतीही भीती न बाळगता आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
पुण्यात करोना बाधित रुग्णांची संख्या 16 वर पोहोचली आहे. यातील पुण्यात 7 तर पिंपरी चिंचवडमध्ये 9 रुग्ण आहेत. 278 कोरोना संशयितांनी चाचण्या केल्या होत्या. पण त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ही आल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कोरोना हा जीवघेणा आजार नसून त्याच्या उपचार केल्यानंतर तो बरा होईल अशा सुचना प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.