कोरोनाचा राजकीय क्षेत्रात शिरकाव, भाजपच्या दोन नगरसेवकांचा रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’
![BJP MLAs resign over Maratha reservation issue](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/BJP-9.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसत आहे. सत्ताधारी भाजपच्या दोन नगरसेवकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नगरसेवक उत्तम केंदळे आणि शैलेश मोरे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
आजपर्यंत शहरातील 4 हजार 336 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. प्रभागातील नागरिकांच्या मदतीला जाणा-या नगरसेवकांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. निगडी-यमुनानगरचे भाजप नगरसेवक उत्तम केंदळे यांना शुक्रवारी (दि. 3) कोरोनाची लागण झाली आहे.
आनंदनगर, भाटनगरचे भाजप नगरसेवक शैलेश मोरे यांचा देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांनी घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचे रिपोर्ट आज रविवारी (दि. 5) पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान, यापूर्वी चिंचवड विधानसभा मतदार संघातील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविकेला, माजी नगरसेवक असलेल्या त्यांच्या पतीसह कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच, दापोडीतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या कुटुंबातील सहा सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.