breaking-newsपिंपरी / चिंचवड

केरळसाठी पिंपरी चिंचवड मधून मदतीची मागणी 

पिंपरी – केरळमधील पाऊस आणि पुराने केरळमध्ये आतापर्यंत शेकडो बळी घेतले आहेत. आणि कोट्यावधींचे नुकसान देखील झाले आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडलेल्या केरळसाठी मदत म्हणून पिंपरी चिंचवड महापालिका आयुका श्रावण हर्डीकर यांना भाजपच्या साऊथ इंडियन सेल च्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.  पिंपरी चिंचवड साऊथ इंडियन सेलचे अध्यक्ष राकेश नायर यांनी या बाबत निवेदन दिले आहे.
महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, पिंपरी चिंचवड साऊथ इंडियन सेलचे अध्यक्ष राकेश नायर, सुनील गोपीनाथ, सुमेश पिलाइ, रिजीकुमार, सत्यनाथन प्रसाद आदी या वेळी उपस्थित होते.  साऊथ इंडियन सेलच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधींनी कडून किमान महिन्याचं वेतन देऊन खारीचा वाटा उचलावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button