कार घेण्यासाठी एकाच बॅंकेकडून घेतले दोनवेळा कर्ज, 11 लाखांची केली फसवणूक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/Financial-Fraud.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
होंडा सिटी कार घेण्यासाठी एकाच बॅंकेतून दोनवेळा कर्ज घेऊन बॅंकेची 11 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अमित प्रभाकर येवले (सहकर्जदार) आणि सचिन प्रभाकर येवले (दोघे रा. सान्वी हाईट्स, आंबेठाण रोड, चाकण, ता. खेड, जि. पुणे, मूळ रा. गंगापूर, बु. गावठाण, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सुनिल नारायण पानसरे (वय 46, रा. श्रीराम कॉलनी, आळंदी रोड, भोसरी, पुणे, सध्या रा. लक्ष्मीनारायण कॉलनी, वडमुखवाडी, च-होली) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित आणि सचिन यांनी 12 ऑगस्ट 2016 ते 24 जानेवारी 2020 दरम्यान होंडा सिटी कार घेण्यासाठी बॅंकेकडून दोनवेळा कर्ज घेतले. राजगुरूनगर सहकारी बॅंकेने त्यांना कर्ज दिले. परंतु, दोनवेळा कर्ज घेतल्याचे निदर्शनास येताच बॅंकेचा विश्वासघात केल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली. दोघांनी बॅंकेला 11 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. चाकण पोलीस तपास करत आहेत.