Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची निदर्शने
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/IMG-20191216-WA0039.jpg)
पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी
देशातील महिला आणि क्रांतिवीर विनायक दामोदर सावकर यांच्याबाबत अवमानकारक भाष्य केल्याबाबत पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारी पिंपरी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी महापौर माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, माजीमंत्री लक्ष्मण ढोबळे, नगरसेवक मोरेश्वर शेंडगे, प्रदेश कार्यकारिणी सदस्या उमा खापरे, महिला आघाडीच्या अध्यक्षा शैला मोळक, नगरसेविका अनुराधा गोरखे, शैलजा मोरे आदी उपस्थित होते.