breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कचरा जाळणा-यांवर आता दंडात्मक कारवाई, आरोग्य विभागाचे आदेश

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत छोट्या व मोठ्या प्रमाणात कचरा जाळून प्रदुषण करणा-या व्यक्तींविरोधात करवाई करण्यात येणार आहे. आरोग्यास हाणी पोहचविणा-या व्यक्तींविषयी माहिती मिळाल्यास त्वरीत पालिकेशी संपर्क साधावा, असे आवाहन आरोग्य विभागाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी केली आहे.

घनकचरा व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदीनुसार तसेच राष्ट्रीय न्यायाधिकरण यांच्या आदेशानुसार कचरा जाळणा-या व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. त्यानुसार छोटया प्रमाणात कचरा जाळणा-या व्यक्तींविरोधात कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद आहे. मोठ्या प्रमाणात कचरा जाळणा-या व्यक्तींविरोधात 25 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत कचरा जाळण्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. कचरा जाळून प्रदुषण केल्यास नागरिकांच्या आरोग्यावर परिणात होत असतो. असा कचरा न जाळता त्याचे नियमानुसार विघटन करण्यात यावे. किंवा पालिकेच्या कचरा संकलन विभागाकडे कचरा जमा करण्याची तस्ती घ्यावी, असे आवाहनही डॉ. रॉय यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button