कंपनीला लाखो रुपयांचा गंडा, एजंट भोसरी पोलिसांच्या ताब्यात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/fraud.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
माल खरेदी करुन देण्याच्या नावाखाली कंपनीच्या शॉपी धारकांकडून पैशे घेऊन एजंटने कंपनीला लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी फारुक शेख (रा. खडकपाडा कल्याण) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात कंपनीच्या चेअरमन मीना सतीश माळी (वय 40) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फारूक शेख DNRS (डीएनआर शपींग) कंपनीचा एजंट म्हणून काम करत होता. कंपनीच्या कमिशनमधून शॉपीधारकाला माल खरेदी करून देण्याचे आमिष दाखवून त्याने ग्राहकांकडून पैसे घेतले. 4 लाख 98 हजार 627 रुपये घेऊन त्याचा माल कंपनीकडून घेतला. त्यावेळी शपीधारकाकडून कंपनीला 3 लाख 98 हजार 600 रुपये ऑनलाईन ट्रान्सॅक्शनद्वारे देण्यात आले. उर्वरीत 1 लाख 27 रुपये शॉपीधारकाने फारुककडे दिले. मात्र, फारुकने ते पैसे कंपनीला जमा केले नाहीत. मी खर्च केले असून नंतर देतो असे सांगितले. त्यावर कंपनीनेही त्याला पैसे भरण्यासाठी मुदत दिली.
दरम्यान, 21 जून 2018 ते 25 जून 2018 दरम्यान पांडुरंग नागरे यांनी माल खरेदीसाठी 1 लाख रुपये जमा केले होते. त्या पैशाचा पुरेपूर माल फारुक याच्यामार्फत नागरे यांना पाठविण्यात आला. मात्र, फारुकने त्यातील 64 हजार रुपयांचा किराणा माल परस्पर लांबविला. यासह अन्य घटनांमध्ये फारुकने असा एकूण 2 लाख 9 हजार 527 रुपयांचा अपहार केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.