एम्पायर उड्डाणपूलावर बस थांब्याचे काम सुरु, शनिवारी रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत वाहतूक बंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/4nagar_road_brt.jpg)
- बस थांब्याचे काम सुरु असल्याने रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत वाहतूक बंद
पिंपरी ( महा ई न्यूज ) – चिंचवडच्या आॅटो क्लस्टर पासून काळेवाडीकडे जाणा-या संत मदर तेरेसा उड्डाणपूल आज (शनिवारी दि. 4 मे ) रोजी रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत वाहतूकीस बंद करण्यात आलेले आहे. त्या पुलावर बीआरटीएस बस थांब्याचे काम महापालिकेकडून सुरु आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या बीआरटीएस विभागाने केले आहे.
चिंचवडचा एम्पायर इस्टेट उड्डाणपुलावर चिंचवड लिंकरोड बाजूकडे, बस थांबा बांधणेचे काम महापालिकेकडून सुरु आहे. आॅटो क्लस्टर कडून काळेवाडीकडे येणारा उड्डाणपुल वाहतूकीस बंद करावा लागला आहे. उड्डाणपुल काळेवाडीकडे जाणारी वाहतूक अत्यंत तुरळक असल्याने काळेवाडीकडे जाणारी वाहने मोरवाडी पिंपरी अथवा चिंचवड स्टेशन चाैकातून काळेवाडी जाण्यासाठी जुने पर्यायी मार्ग उपलब्ध आहेत. बस थांब्याचे कामकाज रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत मे. टेक्सन बिल्डर्स हे करीत आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन महापालिका बीआरटीएस विभाग व वाहतूक विभागाने केले आहे.