Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
उपमहापौरांच्या उपस्थितीत योगाची प्रात्यक्षिके
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/WhatsApp-Image-2018-06-21-at-1.28.05-PM.jpeg)
पिंपरी – उपमहापौर शैलजा मोरे यांच्या वतीने जागतीक योगा दिनानिमित्त आयोजित योग शिबिरात प्रभागातील महिला, तरुण, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.
निगडी प्राधिकरण प्रभाग १५ मधील सेक्टर २८ च्या ज्ञानेश्वर उद्यानातील हॉलमध्ये गुरुवारी (दि. 21) योगा प्रात्यक्षिके घेण्यात आली. उपमहापौर शैलजा मोरे, भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव अनुप मोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या शिबिरात विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. शिबिरात योग शिक्षक मानसी कुलकर्णी व रेश्मा साळेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन करून प्रात्यक्षिके करून घेतली.
या योग शिबिरास सलीम शिकलगार, मनोज देशमुख, केतन जाऊळकर, प्रसेन अष्टेकर, नरेंद्र येलकर, सुहास करडे, अण्णा कर्डिले, प्रभाग १५ मधील सर्व आजी-माजी पदाधिकारी मदत केली.