उखाण्यातून स्त्रियांची कल्पकता व कविवृत्ती झाली जागृत – रुपाली साने
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/IMG-20210226-WA0018.jpg)
- चिखली परिसरात भव्य-दिव्य हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमाचा समारोप
- तब्बल ११ दिवस महिला भगिनींच्या उस्फुर्त सहभागाने प्रभागात रचला इतिहास – पांडा साने
पिंपरी : प्रभाग क्रमांक १ चिखली परिसरात युवा नेते पांडाभाऊ साने व रूपालीताई साने यांच्या वतीने आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य-दिव्य अशा हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. प्रभागातील जवळपास प्रत्येक कॉलनीत तब्बल ११ दिवस हा उपक्रम सुरु होता.
चिखली भागातील विविध सोसायटीनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. रुपालीताईंच्या माध्यमातून जवळपास दहा हजार सुवासिनींना सौभाग्याचा मन मिळाला. कार्यक्रमाला महिला भगिनींचा तुफान प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या अनुषंगाने कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. या हळदी कुंकू समारंभास प्रभागातील दत्त सोसायटी, भावेश्वरी सोसायटी, नवचैतन्य सोसायटी, स्वप्न नगरी सोसायटी, गोकुळ सोसायटी, पांढरकर सोसायटी, प्रांशू स्क्वेअर, मनीषा, यशवंत, वसंतलीला, नायर, ड्रीम्स पार्क, कृष्णाई, पोलाईट, ओम साई, साई श्रद्धा, शिवकृपा, शिवपार्वती, गुरुकुल, विठ्ठल रुक्मिणी, सुयोग, माउली राजगड पार्क १ ते ६ या सोसायटी परिसरातील महिला भगिनी समारंभात सहभागी झाल्या होत्या.
सामाजिक कार्यकर्त्या रुपाली साने म्हणाल्या की, आजच्या आधुनिक यंत्रयुगात संस्कृती, धर्म, रूढी, परंपरा मागे पडत चालल्या आहेत. भव्य-दिव्य अशा हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘चूल आणि मूल’ यातून स्त्रियांनी काहीसा मोकळा वेळ मिळाला. उखाण्यातून स्त्रियांची कल्पकता, कविवृत्ती जागृत होऊन त्यातून मिळणारा आनंद एकमेकींबरोबर वाटला. एकमेकींनी वाण लुटले. प्रत्येक महिला भगिनींना भेटवस्तू देण्यात आल्या. महिलांच्या चेहऱ्यावर समाधानाचा भाव दिसत होता.
पांडा साने म्हणाले की, धार्मिक रूढी जपायची म्हणून हळदी-कुंकू नाही तर, त्या निमित्ताने आपल्यातील व्यवस्थापन कौशल्य, कलाकुसर तसेच वैचारिक /बौद्धिक देवाणघेवाण होते, म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बचत गटांच्या सहभागी महिलांचा सन्मान करून, त्याचं प्रत्येक पाऊल प्रगतीचं कसं ठरेल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. कोरोना काळात नागरिकांना दिलेल्या ‘एक हात मदतीचा’ बद्दल नागरिकांनी कौतुक व आभार मानले. असा कार्यक्रम प्रभागात आजपावतो कोणी घेतला नाही, त्यामुळे महिलांमध्ये कुतुहूल जागृत झाले होते. महिलांसाठी विविध खेळांचे आयोजनही करण्यात आले होते.