breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंधन दरवाढ, वीजबील, महागाई विरोधात पिंपरीत संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलन

पिंपरी |महाईन्यूज|

कोरोना विषाणू महामारीच्या परस्थितीत भरमसाठ दिलेले वीज बिल पूर्ण माफ करावे, इंधनाचे दर तत्काळ कमी करावेत, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज (मंगळवार) पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चाैकात आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार केंद्र सरकारच्या जुलमी कायद्याचा निषेध केला.

कोरोना महामारीमुळे मध्यमवर्गीय, व्यापारी, कामगार, शेतकरी सर्वांचे अतोनात नूकसान झाले आहे. छोटे-मोठे उद्योगधंदे, व्यापारी, दुकाने सर्व बंद झाले होते. त्यामुळे सर्वांना आर्थिक झळ बसली गेली. हा काळ फक्त जिवंत राहण्यासाठी आहे. सर्वांनी काळजी घ्यावी असे सत्ताधारी लोक नेहमी माध्यमाद्वारे जनतेचा आवाहन करत होती. मात्र, याच कोरोनाच्या काळात वीज वितरण कंपनीने राज्यभरातील जनतेला भरमसाठ वाढीव बिले पाठवली, विज बिलाची जबरदस्तीने वसूली केली जाते, बिल नाही भरल्यास इलेक्ट्रिक मिटर काढुण टाकले जात आहेत, हे महाविकास आघाडीचे राज्यसरकार जनसामान्याचे नसुन मोगलाई सरकार आहे. असे वाटत आहे. आघाडी सरकारचे विज मंत्री नितीन राऊत यांनी वाढीव बिले माफ करू, कमी करू असे आश्वासन दिले होते, तसे होत नाही वसूली हुकूमशाही शासन करीत असल्याची जनसामान्यांची भावना निर्माण झाली आहे. यातून संताप व उद्रेक झाल्यास आपणाच जबाबदार रहाल याची गांभीर्याने नोंद घ्यावी,असा इशारा अभिमन्यु पवार यानी दिला.

मराठा सेवा संघ-उद्योग कक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष प्रकाश जाधव यानी संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनास पाठिंबा दिला. ते म्हणाले की, सामान्य जनतेचा आक्रोश वाढत आहे. केंद्र सरकार व राज्य शासनाने पेट्रोल, डिझेल ,गॅसचे दर भरमसाठ वाढवलेले आहे. यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेला पुन्हा या दरवाढीचा मोठा फटका बसत असून त्यांचे जीवन जगने असह्य झाले आहे. यामुळे या दोन्ही गंभीर विषयी आपण निर्णय घेऊन इंधनाचे वाढलेले दर कमी करावे. वाढीव वीज बिले पूर्णपणे माफ करावेत. तर या जनहिताच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड सत्ताधारी लोकाना सत्तेतून घरी पाठवण्याचे काम करेल. अशी भावना व्यक्त केली.

मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष लक्षमण रानवडे यानी संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाला पाठींबा दिला.  जिजाऊ ब्रिगेड च्या शहराध्यक्षा स्मिताताई म्हस्कर यानी मोदी सरकारचा निषेध करुन,आंदोलानास पाठिंबा दिला. जिजाऊ ब्रिगेडच्या शहर सचिव शिवमती शामल पाटिल यांची उपस्थिती होती. मनोजकुमार गायकवाड यानी निषेध आंदोलानात केंद्र व राज्य सरकारला इंधन दरवाढ व विजबिल या दोन विषयावर लवकरात लवकर कार्यवाही करावी अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने यापूढे तीव्र आंदोलन करण्यात येईल. यात जे काही नुकसान होईल त्याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. असा गर्भित इशारा मनोजकुमार गायकवाड यानी दिला. या आंदोलन प्रसंगी राजमाता जिजाऊ वधू-वर सूचक चे शिवश्री खामकर,वाल्मिक माने,आशोकराव सातपुते, प्रा.चौधरीसर, शिवश्री जाधव, संभाजी ब्रिगेड दिघी विभागाचे आमोल कदम, भोसरी विभागाचे किरण माने, संभाजी ब्रिगेडचे शहर सचिव श्रीकांत गोरे, उपाध्यक्ष आप्पा चांदवडे, संघटक सातिष मर्दान घावटे, राजेश सातपुते, दिलिप जाधव, ज्ञानेश्वर सालुंके, मोहसिन शाह, इत्यादी कार्यकर्ते उपस्थीत होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button